पुणे महिला मंडळ बालेवाडी बाणेर औंध शाखेने  जागतीक महिला दिना निमित्त ‘टॅलेन्शिया’ विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम

बाणेर : पुणे महिला मंडळ बालेवाडी बाणेर औंध शाखेने  जागतीक महिला दिना निमित्त ‘टॅलेन्शिया’ ह्या विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम  आयोजीत केला होता.

त्यानंतर  महिला सभासदांनी  विविध गुण दर्शनाच्या कार्यक्रमात नूरजहान,  अस्मिता करंदीकर, किरण गुदादे, मनिषा मुळे व जयश्री जोशी (गीत गायन),   संजीवनी औटी,गिरीजा  जोशी, अमृता हमिने, राधिका ठोंबरे, रुपा साळवी (कविता वाचन) आणि  अर्चना देशपांडे (नृत्य ) सादर केले महिला दिनाचे औचित्य साधून महिला सभासदांनी स्नेहसावली ह्या डॅा वैद्य यांच्या  समाजातील निराधार, निरश्रित, ज्येष्ठांसाठी निःशुल्क वृद्धाश्रमासाठी ‘स्नेहसावली-आपलं घर’, देणगी  दिली.

या  सर्व कार्यक्रमाचे नियोजन महिला मंडळाच्या कार्यकारीणीने व अध्यक्षा सौ अस्मिता करंदीकर यांनी केले.  रुपा साळवी व सई काळे यांनी  विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जयश्री बेंद्रे अणि शुभांगी इंगवले यांनी केले. कार्यक्रमासाठी विशेष सजावट संजिवनी औटी यांनी केली होती.

See also  जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाची तिसरी बैठक