आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त औंध येथे महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन

औंध : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून औंध येथील गोळवलकर शाळेच्या मैदानावर महिलांसाठी खेळ – स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तीन कर्तृत्ववान महिला ऍड. मृदगंधा जोशी, डॉ. कल्पना बळीवंत आणि अंजली साठे यांचा सत्कार अनुक्रमे सौ. अनिता ढोरे, पौर्णिमा रानवडे, निशा मानवतकर यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी महिलांसाठी विविध खेळ आणि स्पर्धा घेण्यात आल्या. यात प्रश्नोत्तरे, चित्र आणि ईमोजी वरुन गाणी ओळखणे, त्याचबरोबर इतर अनेक खेळ घेण्यात आले. या स्पर्धांचे संचालन श्री. नीरज कुटेकर याने केले . प्रत्येक खेळात जिंकलेल्या महिलांना भरघोस बक्षिसे देण्यात आली. तसेच या कार्यक्रमास उपस्थित प्रत्येक महिलेला एक उत्कृष्ट बहुउपयोगी बॅग भेट देण्यात आली. या कार्यक्रमास ८०० हून अधिक महिलांनी हजेरी लावली. कार्यक्रमानंतर उपस्थित महिला आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सौ. प्रिती शिरोडे यांनी केले. त्यांना या आयोजनात सौ. वृषाली वाणी, प्राची ओगले, मनीषा कोष्टी, विजया देसाई यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ . स्मिता अमृतकर यांनी केले.

See also  गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत एका दिवसात ८ तालुक्यातील ११ कामांना सुरुवात