जागतिक महिला दिनानिमित्त नवी दिल्ली येथे भारत भूषण पुरस्कार व देशातील कर्तृत्ववान महिलांचा राष्ट्रीय उत्कृष्ट महिला पुरस्काराने सन्मान: औंधच्या अमोल टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार

नवी दिल्ली :  महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे  ,आयोजित, राष्ट्रीय महिला संसद २०२४ भरवण्यात आली होती. देशभरातील १३८ कर्तृत्ववान महिलांचा राष्ट्रीय उत्कृष्ट महिला पुरस्काराने सन्मान करण्यात आला. व संपूर्ण भारतातील सामाजिक  कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या श्रीमती. रिंचेन लाम्हो, भारत सरकार तर्फे माँटेनेग्रो देशाच्या ऑनररी काउन्सुलेट डॉ. जाणीस दरबारी, भारत सरकारच्या अनुसूचित जाती आयोगाच्या माजी सदस्या श्रीमती अनुज बाला, भारत सरकारच्या अर्जुन अवॉर्डी श्रीमती नसरीन, भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाचे सल्लागार सदस्य तसेच फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. आदित्य पतकराव, अभिनेत्री व मॉडल श्रीमती नुपूर मेहता व अनेक मान्यवर उपस्थित होते.

आलेल्या सर्व मान्यवरानी सर्व सन्मानित महिलांचे व भारत भूषण पुरस्कार्थीचे अभिनंदन केले , विशेष कौतुक केले. राष्ट्रीय महिला संसद २०२४ च्या कार्यक्रमादरम्यान पुणे येथील श्री. अमोल दत्तात्रय टेंबरे यांचा सामाजिक कार्यासाठी भारत भूषण पुरस्कार देवून विशेष  सन्मान  करण्यात आला.

कार्यक्रमाची संगता करताना डॉ. आदित्य पतकराव  यांनी देशभरातील सर्व महिलांनी पुढे येऊन आपल्या देशासाठी असेच योगदान करावे व देशाच्या प्रगतीला हाथभार लावावा अशी आशा व्यक्त केली.

See also  दगडूशेठ मंडळाचा पुढाकार भविष्यात विसर्जन मिरवणुकीला दिशा देणारा ठरेल- पालकमंत्री पाटील