भाजपाचे माजी शहर चिटणीस ज्येष्ठ पत्रकार सुनील माने यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश

पुणे. : भाजपाचे माजी शहर सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार सुनील माने यांनी  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. सुनील माने हे माजी खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्ती होते.

मोदी बागेतील शरद पवारांच्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जयदेवराव गायकवाड, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, राष्ट्रवादी लिगल सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष अॅड. भगवानराव साळुखे आदी उपस्थित होते.

बोपोडी दापोडी औंध रोड परिसरातील विविध सामाजिक कार्यामध्ये ते सक्रिय सहभागी असून भारतीय जनता पार्टीमध्ये देखील शहरा मध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे.

यावेळी सुनील माने यांच्या सोबतच माजी नगरसेवक आरिफ बागवान, मा.पंचायत समिती सदस्य सुनील खेडेकर यांनीही आज शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

See also  रेकॉर्ड ब्रेक गर्दी... तरुणाईचा जल्लोषअमोल बालवडकर फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात अवघे कोथरूडकर न्हाऊन निघाले !