पुण्यात आश्चर्यकारक निकाल लागेल-माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण

पुणे – लोकसभा निवडणुकीत पुण्यात आश्चर्यकारक निकाल लागेल, असा विश्वास राज्याचे माजी मुख्य मंत्री आणि काँग्रेसचे प्रचार प्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस भवनात पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी पक्षाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीने धंगेकर यांची उमेदवार म्हणून एकमताने निवड केली आहे. पक्षातही आता नाराजीचा प्रश्न उरलेला नाही. सर्वजण एकदिलाने प्रचारात उतरलेले दिसतील. स्वतः धंगेकर यांनी तर कालपासूनच पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे भेटीगाठी सुरू केल्या आहेत. कसब्याच्या पोटनिवडणुकीमुळे धंगेकर पुणेकरांना माहिती झाले आहेत. त्यामुळे पुण्यात आश्चर्यकारक निकाल लागल्याशिवाय राहाणार नाही, असे चव्हाण म्हणाले आणि धंगेकरच निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.

अपक्ष उमेदवाराचा काय परिणाम होईल या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले. मी, माझ्या पक्षाविषयी तुमच्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे, असे उत्तर त्यांनी दिले. शहराध्यक्ष शिंदे आणि त्यांचे सहकारी मिळून प्रचार यंत्रणा उभी करतील, असे चव्हाण म्हणाले.

See also  ऐश्वर्य कट्ट्यावर जमली राजकारणापलीकडच्या किस्स्यांची मैफिल