पुणे : पुणे महानगरपालिका हे शहरांमध्ये विविध कामे करताना टेंडर प्रक्रिया पार पाडून ठेकेदारांना टेंडरच्या माध्यमातून शहरातील वेगवेगळी कामे देवू करते परंतु ही कामे करताना ठेकेदारांकडून मात्र टेंडरच्या अटी शर्तींचे उल्लंघन होताना सर्रास दिसून येते. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 महात्मा फुले पेठ भागातील सहस्त्रअर्जुन नागरी सहकारी पतसंस्था ते सावधान मंडळ या ठिकाणी नव्याने ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम मागील दीड ते दोन महिन्यापूर्वी काम पूर्ण केले आहे. सध्या परिस्थितीत या ठिकाणी सार्वजनिक शौचालया च्या ड्रेनेज लाईनचे काम झाले असून, ते एकदम निकृष्ट दर्जेचे झालेले असून सदर कामासाठी वापरलेले सिमेंट तसेचं डस्ट पावसाळा सुरू होण्यापूर्वीच निघाल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
आम आदमी पार्टीच्या वतीने अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामांचा निषेध नोंदविण्यात आला असून सदर गोष्टीची माहिती क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी तसेच महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांना संपर्क करून वारंवार सांगून देखील त्यांच्याकडून सदर तक्रारी बाबत ठेकेदाराच्या विरुद्ध कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली. नागरिकांच्या कररूपी पैशातून अशा प्रकारची निकृष्ट दर्जाची कामे जर होणार असतील तर महापालिकेने अशी कामे त्वरित थांबवावी. कारण कामाचा दर्जा पाहता सदरील ड्रेनेज लाईन निकृष्ट दर्जाची असून पावसाळ्यामध्ये मैला पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांना सदर गोष्टींचा त्रास होईल अशी शंका परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. आचारसंहिता लागण्या अगोदर जो महापालिकेने कामाचा धडका चालू केला व गडबडीत टेंडर पास करून घेतले त्या सर्व घाईगडबडीमुळेच ठेकेदार कामे नीट करत नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे मीडिया सहसंयोजक निरंजन अडागळे यांनी केला.