डॉ.आंबेडकर जयंती निमित्ताने आयोजित ऑनलाईन प्रश्नमंजुषाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद

बावधन : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने अरिहंत कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,बावधन,पुणे-२१ येथे राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्यावतीने “डॉ.आंबेडकर जयंती ऑनलाईन प्रश्नमंजुषा”आयोजन करण्यात आले होते.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची व इतिहासाची माहिती त्यांच्या जयंती दिनी विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आज दिवसभरामध्ये जवळपास 119 विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन प्रश्नमंजुषा मध्ये आपला सहभाग नोंदवला.बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन ई-प्रमाणपत्र मिळविले.म्हणजेच आज खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिनव पद्धतीने अभिवादन करून या उपक्रमाचा उद्देश सफल केला.या ‘डॉ.आंबेडकर जयंती ऑनलाईन प्रश्नमंजुषा’ कार्यक्रमाचे आयोजन रासयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.अशोक कांबळे यांनी केले होते.या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी अरिहंत ऐज्युकेशन फॉऊंडेशनचे शैक्षणिक संचालक डॉ.हेमंत भिसे सर व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मा.मंगेश ताकपीरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

See also  यशवंत पंचायत राज व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील पुरस्कारांचे वितरण