औंध ग्रामदेवतेचा उत्सव मे महिन्यात

औंध : दरवर्षी साजरा होणारा औंध ग्रामदेवतेचा उत्सव यंदा मे महिन्यातील रविवार (ता. ०५) होणार आहे. औंधगाव विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही तारीख घोषित करण्यात आली.

सालाबादप्रमाणे ग्रामस्थांची ग्रामसभा भैरवनाथ मंदिरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी परंपरेप्रमाणे सर्व आसमधनी, विश्वस्त, ग्रामस्थ यांच्या हस्ते नीलकंठेश्र्वर मंदिरात श्री गणेश पूजन, शिवपूजन करण्यात आले. परंपरागत पंचांग पूजन, वाचन करून औंधगाव विश्वस्त मंडळाचे अहवाल वाचनासह जमाखर्चाचा आढावा घेण्यात आला. गावच्या समस्या आणि ग्रामस्थांच्या त्यावरील सूचना, सर्वांचे मनोगत मांडण्यात आले.

विश्वस्त मंडळाच्यावतीने या वेळी ग्रामस्थांचे सत्कार करण्यात आले. अध्यक्ष राहुल प्र. गायकवाड, सचिव गिरीश जुनवणे, खजिनदार हेरंब कलापुरे, विश्वस्त योगेश जुनवने, महेंद्र जुनवणे, विकास गायकवाड, सागर गायकवाड, सुप्रिम चोंधे, विलास रानवडे, सुशिल लोणकर, सोपान राऊत यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून रविवार ०५ मे २०२४ ही उत्सवाची तारीख घोषित केली.

See also  टिंबर मार्केट येथील आगीच्या घटनास्थळाची पालकमंत्र्यांकडून पाहणी