जी-20 च्या स्वागतासाठी अनधिकृत केबलची रांगोळी? अनाधिकृत केबल मुळे पालिकेचे करोडो रुपयांचे नुकसान

औंध : पुणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी एरिया मध्ये रस्त्यांवर पडणाऱ्या अनाधिकृत केबलमुळे वाहन चालक व पादचारी नागरिकांना होणारा त्रास याबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पुणे महानगरपालिकेचा कोट्यावधी रुपयांचा महसूल देखील बुडवला जात आहे.

पुणे महानगरपालिकेच्या विद्युत खांबावर सर्रासपणे अनधिकृत केबल टाकण्यात येत आहेत. या केबल तुटल्यानंतर त्या रस्त्यावर पडून राहतात अनेकदा वाहन चालकांच्या मार्गामध्ये या केबल येत असल्यामुळे अपघात देखील होतात.

अनधिकृत केबल वरील ठोस कारवाई होत नाही. तोंड देखल्या कारवाईमुळे नागरिकांना आदचारी मार्ग व मुख्य रस्त्यांवर देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

औंध बाणेर बालेवाडी परिसरामध्ये अनेक ठिकाणी अनाधिकृत केबलच्या मुळे पुणे महानगरपालिकेचे विद्युत खांब वाकले आहेत.

रस्त्यांवर पडणाऱ्या केबल मुळे होणारे नक्षीकाम जी- 20 च्या स्वागतासाठी असल्याची उपहासात्मक टीका देखील पुणे महानगरपालिकेवर होत असून करोडो रुपये महसूल बुडत असताना देखील पुणे महानगरपालिकेचे अधिकारी ठोस कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अनधिकृत विद्युत खांबावरील केबल वर कारवाई करून केबल कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  स्वीप कार्यक्रमांतर्गत कोथरूड विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती