स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांचे वडील महादेव एकनाथ निम्हण यांचे दु:खद निधन

पाषाण : पाषाण गावचे ग्रामस्थ व स्वर्गीय आमदार विनायक  निम्हण यांचे वडील श्री महादेव एकनाथ  निम्हण (वय 88) यांचे आज शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे.

जलतरण तलावावर एक रूपया वेतनावर सुरक्षा रक्षकाचे काम करूण नंतर वीट कारखानदार ते बांधकाम व्यावसायिक असा प्रवास करणारे निम्हण हे दादा नावाने परिचित होते. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना व्यावसायिक दूरदृष्टी ठेवून अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

See also  माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निवेदन जाळून पुणे महानगरपालिकेचा निषेध