मार्केट यार्डात पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गाठीभेटी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्डमध्ये महायुतीच्या प्रचारार्थ भेटी-गाठी घेतल्या. पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, बारामतीच्या उमेदवार  सुनेत्रा पवार, शिरूरचे उमेदवार श्री. शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी संपूर्ण परिसरात विविध घटकांशी संवाद साधला.

शेतकरी, हमाल बांधव, आडते व्यापारी, विक्रेते आणि नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन महायुतीच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी मार्केट यार्डमधील सर्वच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत करून शुभेच्छा दिल्या. या संवाद दौऱ्याची सुरुवात अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली तर सांगता श्री शारदा गजानन मंदिरात झालेल्या आरतीने झाली.

यावेळी आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार चेतनदादा तुपे-पाटील, दीपकभाऊन मानकर, रमेश कोंडे, बाबाशेठ मिसाळ, संतोष नांगरे, गणेश घुले, सुभाष जगताप, बापू भोसले, श्रीनाथ भीमाले, मानसी देशपांडे, आबा शिळीमकर, प्रवीण चोरबोले, महेश शिंदे, नानासाहेब आबनावे, दिलीप काळभोर, रवींद्र कंद, अनिरुद्ध भोसले, दिलीपराव काळभोर, विकास दांगट, वैशाली नागवडे, राजेश मोहोळ, नितीन जामगे, आप्पा कोरपे, राहुल कोंढरे, योगेश यादव, बापू टेमकर, पै. संजय सस्ते, अमोल घुले, विशाल केकाने, अरविंद मोरे, प्रशांत कुदळे, गौरव कापरे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी मार्केटयार्ड मधील विविध संघटनांची पदाधिकारी श्री शारदा गजानन ट्रस्टचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  भाजपचा खोटा प्रचार रोखण्यासाठी टीम उभी करा-निरंजन टकले