औंध राजीव गांधी घाट, मलिंग वाघाचा घाट परिसरात नदीपात्र स्वच्छ्ता अभियान

औंध : वसुंधरा दिनानिमित्त औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत जिवीत नदी फाउंडेशन व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने उप आयुक्त श्री. संदिप कदम घनकचरा व्यवस्थापन विभाग, उप आयुक्त परिमंडळ क्र. २ श्री गणेश सोनुने व मा. महापालिका सहाय्यक आयुक्त श्री गिरीष दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली औंध राजीव गांधी घाट, मलिंग वाघाचा घाट व औंध स्मशान भूमी घाट येथे नदीपात्र स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले.


यामध्ये औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय कडील वरिष्ठ आरोग्य निरिक्षक श्री विजय भोईर, आरोग्य निरीक्षक ज्योती माने, निखिल निकम, योगेश जाधव, शिवाजी गायकवाड, विनायक चोपडे, प्रमोद उकिर्डे, संतोष बनसोडे व सर्व मोकादम, जीवित नदी संस्थांचे श्रीमती मृणाल वैद्य मॅडम व सर्व सेवक/स्वच्छ संस्था प्रतिनिधी सहभागी होते. या अभियाना मध्ये नदी पात्रातील स्वच्छ्ता करून अंदाजे ३५० किलो कचरा संकलित करण्यात आला.

See also  देशाच्या आर्थिक, सामाजिक विकासात सनदी लेखापालाचे योगदान - 'पीएमआरडीए'चे अतिरिक्त आयुक्त सीए दीपक सिंगला यांचे प्रतिपादन; 'आयसीएआय' पुणेच्या वतीने दीक्षांत सोहळा