कोथरूडमध्ये चार हॉटेल्सवर पालिकेची धडक कारवाई

कोथरूड : महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने रूफटॉप हॉटेल, अनधिकृत बांधकाम, पत्रा शेड असे ४ हॉटेल्सचे १०हजार चौरस फूट क्षेत्र रिकामे केले. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. हॉटेल नक्षत्र रेस्टो बार, स्पाईस गार्डन, कोरियडेर लिफ रेस्टॉरंट, हॉटेल टेस्टी बेस्टी या ४ हॉटेल्स वर कारवाई झाली.

महापालिकेचे १० कर्मचारी आणि ६ पोलीस कर्मचारी असे पथक कारवाईसाठी नेमले होते. बांधकाम विभागाचे आधिक्षक अभियंता राजेश बनकर, कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. त्यात उप अभियंता श्रीकांत गायकवाड, कनिष्ठ अभियंता मनोजकुमार मते, सागर शिंदे, राहुल रसाळे, समीर गडाई आणि सहायक गणेश ठोंबरे, राठोड, भावेश, ऋषिकेश जगदाळे आदींनी कारवाईत भाग घेतला. एक जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर कारवाईसाठी वापरण्यात आले होते.

See also  पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून उभारण्यात आली ‘न्यायाची गुढी’.‘‘न्याय कार्ड’’ घरोघरी पोच करणार – अरविंद शिंदे, अध्यक्ष-पु.श.काँ.क.