देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल हे स्वागत करण्याजोगे आम आदमी पार्टी

मुकुंद किर्दत, प्रवक्ते, आम आदमी पार्टी

  देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल हे स्वागत करण्याजोगे आहेत. महत्त्वाचे म्हणजे मतदारांनी मोदी यांच्या गॅरंटीला म्हणजेच त्यांच्या आश्वासनातला फोलपणा जाणून नाकारलेले आहे. त्यासोबत महागाई,बेरोजगारी, ईडीसीबीआय यंत्रणांचा गैरवापर, द्वेशाचे राजकारण याबाबतचा नाराजी व्यक्त केलेली आहे. संविधानाने दिलेले आरक्षण आणि लोकशाही याच्या रक्षणासाठी आजचा निकाल हा महत्वपूर्ण ठरणार आहे.

निवडणुकीवर प्रभाव करणारे अनेक घटकांचा वापर भाजप सरकारने केला. त्यामध्ये आम आदमी पार्टीचे सर्व महत्त्वाचे नेते या काळामध्ये तुरुंगात राहतील असा प्रयत्न केला गेला. परंतु जनतेने जेल का जबाब वोट से या नार्यानुसार आपला भरघोस मतदान केल्याने आप ची दिल्ली पंजाब हरियाणा गुजरात राज्यातील मतदानाची टक्केवारी मागील लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

2019 मध्ये मोदींविरोधात आघाडीसाठी पुढाकार घेणारे चंद्राबाबू नायडू 2024 च्या निवडणुकीत असाच पुढाकार घेणारे नितेश कुमार हे जाणते पणे आपली पुढची वाटचाल करतील अशी आशा आहे.  पुढची वाटचाल ही इतर घटकांबरोबर जुळवून घेत , आघाडी करीत करावी लागेल त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये याबाबत स्पष्टता येईल अशी आशा आहे.

See also  संगणकातील प्रोग्रॅम भाषा व संस्कृत भाषा हे एकमेकांशी जुळणारे आहेत - मा डाॅ पराग काळकर, प्रकुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ