औंध येथील अतिक्रमणावर पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग व औंध क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने संयुक्त कारवाई

औंध : महानगरपालिका सहायक आयुक्त औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालय यांचे  नियंत्रणात औंध, बोपोडी परिसरातील अतिक्रमणावर संयुक्त कारवाई करण्यात आली.

आयटीआय रोड औंध, क्रॉसवर्ड समोर, आंबेडकर चौक औंध व औंध परिसर, भाऊ पाटील रोड बोपोडी या ठिकाणांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी एक स्टॉल 15हातगाड्या,  14 काउंटर, दोन सिलेंडर, इतर नऊ तसेच 15 शेड व झोपड्या यांच्यावर कारवाई करण्यात आली. सदर कारवाईस परिमंडळ ०१ ते ०४ कडील अतिक्रमण पथके, बांधकाम विकास विभागाचे अभियंते, वाहतूक पोलीस, चतु:श्रुंगी पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कारवाई दरम्यान आंबेडकर वसाहत येथे काही नागरिकांनी व व्यावसायिकांनी विरोध केल्यामुळे काही काळ कारवाई थांबवण्यात आली होती. यानंतर नागरिकांची समजूत काढत कारवाई सुरू ठेवण्यात आली. औंध परिसरामध्ये सातत्याने वाढत असलेली अतिक्रमणे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीवर अनधिकृत पथारी व स्टॉल धारकांवर तसेच औंधच्या बाहेरून रस्त्यांवर व्यवसायासाठी येणाऱ्या स्टॉल धारकांवर सातत्यपूर्ण कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी या संदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आळा घालण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच वाईन व दारूच्या दुकानाबाहेर दारू पिणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

See also  सोमेश्वर फाउंडेशन तर्फे विक्रमी 1069 जणांचे रक्तदान, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन