दिलीप वेडेपाटील फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

बावधन : माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जगाने स्वीकारलेल्या 21 जून या जागतिक योग दिनानिमित्ताने दिलीप वेडेपाटील फाऊंडेशन, भारतीय योग संस्थान(पंजी) व ऋग्वेद योगा यांच्या संयुक्त विद्यमाने छ.संभाजी महाराज क्रीडांगण, एलएमडी चौकम बावधन येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये योगासने, ऋग्वेद योगा संस्थेच्या माध्यमातून योगाधारित नृत्याविष्कार सादर करण्यात आला.यावेळी बावधन परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालय आणि पुणे महानगरपालिका शाळा १५३ बी, ८२ बी चे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते.

See also  पत्रकार जगदाळे यांच्या स्मरणार्थ बारामती मुर्टी गावातवृक्षारोपण