बाणेर-बालेवाडीतील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने पुन्हा एकदा विविध चौकांमध्ये ट्रॅफिक वॅार्डनची नियुक्ती

बाणेर : बाणेर-बालेवाडीतील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने पुन्हा एकदा विविध चौकांमध्ये ट्रॅफिक वॅार्डनची करण्यात आली नियुक्ती. 

राधा चौक, गणपती मंदिर चौक बालेवाडी फाटा, बालेवाडी ममता चौक, वाडकर चौक बीटवाईज जवळ व ननावरे चौक बाणेर यासारख्या बाणेर बालेवाडीतील विविध महत्त्वाच्या चौकांमध्ये कायमस्वरूपी “ट्रॅफिक वॉर्डन” सकाळी (८ ते १२) व संध्याकाळी (५ ते ९) नागरिकांच्या व वाहतूक यंत्रणेच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत.

वाहतूक कोंडी हा बाणेर बालेवाडीच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मेट्रोच्या सुरु असलेल्या कामामुळे दिवसेंदिवस हा वाहतुक कोंडीचा प्रश्न अधिक बिकट होत चाल्लेला आहे. या त्रासातुन नागरीकांची मुक्तता करण्यासाठी गेल्या वर्षी देखिल सलग सहा महिने दररोज १५ ट्रॅफिक वॅार्डनची नियुक्ती “अमोल बालवडकर फाऊॅंडेशनच्या”  वतीने केली गेलेली होती. या उपक्रमाचे बाणेर-बालेवाडी भागातील नागरीकांनी भरभरुन कौतुक देखिल केले.

गतवर्षी राबवण्यात आलेल्या उपक्रमाला यश आले असून वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या अडचणी ट्रॅफिक वॉर्डन्सच्या माध्यमातून सुटण्यास मदत होत आहे हे पाहून खूप समाधान वाटले.

See also  विशाळगड अतिक्रमणांबाबत केवळ दिखाऊपणा करणाऱ्या प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार : १४ जुलै रोजी शिवभक्त विशाळगडावर जाणारच छत्रपती संभाजी राजे यांचा निर्धार