बालवडकर परिवाराच्या वतीने मोफत पंढरपूर यात्रेचे आयोजन

बालेवाडी : दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त बालेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संजय बालवडकर, नगरसेवक अमोल बालवडकर व राहुल बालवडकर यांच्या वतीने मोफत पंढरपूर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. बालवडकर परिवाराची वारकरी सेवेसाठी  सलग ३० वर्षे हा उपक्रम सुरू आहे.

विठुरायांचे दर्शन घेण्यासाठी या यात्रेत ६५० भाविक सहभागी झाले. माऊलीचे नामस्मरण करून मोठ्या भक्तिभावाने व पवित्र वातावरणात सदर यात्रा १२ बसेसच्या माध्यमातुन पंढरपूर नगरीकडे रवाना झाले. विठ्ठल-रखुमाईच्या गजरात संपूर्ण परिसर यावेळी दुमदुमला.


See also  सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे १६ ऑगस्टपासून बेमूद काम बंद अंदोलन