सुसगाव येथे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी अखेर पोलिसांनीच मुजवला रस्त्यातील खड्डा

सुसगाव :  सुसगाव येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून संथ गतीने वाहतूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पुणे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अखेर वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनीच खड्डा दुरुस्तीचे काम हाती घेतले.

सुसगाव येथील रस्ते रुंदीकरण अद्याप झालेले नाही. गाव पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर अपेक्षित रस्त्यांची कामे होत नसल्याने वारंवार वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वारंवार तक्रारी करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येते.

सुसगाव परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरच पडलेले खड्डे पालिका मुजवत नसल्याने अंतर्गत रस्त्यांना वाली कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुसगाव परिसरातील मुख्य वाहतूक असलेले रस्ते खड्डे मुक्त करण्यात यावेत अशी मागणी सुहास भोते यांनी केली आहे.

See also  काँग्रेस अनुसूचित जाती जमाती अध्यक्षांच्या वतीने कोथरूड कचरा प्रश्न संदर्भात सहाय्यक आयुक्तांना निवेदन