कोथरूड : अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून कोथरूड मतदार संघातील शास्त्रीनगर सुतारदरा आणि कर्वेनगर येथे तसेच बाणेर बालेवाडी येथील अमोल बालवडकर यांच्या भाजपा कार्यालयांमध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”लाभ देण्यासाठी माहिती रथाच्या माध्यमातून नोंदणी केली जात आहे.
महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” घोषित केलेली असून या योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला १५०० रू. लाभार्थी महिलेच्या खात्यावर जमा होणार आहेत.
सदरील योजनेची नावनोंदणी कोथरूड मतदारसंघामध्ये शास्त्रीनगर, सुतारदरा आणि कर्वेनगर येथे तसेच बाणेर बालेवाडी मधील अमोल बालवडकर यांच्या संपर्क कार्यालयात सुरू असून नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येक महिलेस अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून आकर्षक साडी देखील भेट स्वरूपात दिली जात आहे. तरी जास्तीत जास्त पात्र माता भगिनींनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.