बाबुरावजी घोलप महाविद्यालयात बॅरिस्टर जयकर व्याख्यानमाला संपन्न

सांगवी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने बॅरिस्टर जयकर व्याख्यानमालेचे आयोजन नुकतेच महाविद्यालयात करण्यात आलेले होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांच्या हस्ते झाले.

आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये बोलताना प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी बॅरिस्टर जयकर यांच्या विषयी माहिती सांगत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा प्रकारच्या व्याख्यानमाला प्रेरक ठरणार असून विद्यार्थ्यांनी व्याख्यानमालेमध्ये उपस्थित राहून मिळणाऱ्या ज्ञानाचा आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोग करून घेण्याचे आव्हान केले. ह्या व्याख्यानमालेच्या प्रास्ताविकामध्ये बोलताना विभाग समन्वयक प्रा.भास्कर घोडके यांनी या व्याख्यानमालेच्या आयोजनाबाबतची मुख्य भूमिका विषद केली. विद्यापीठाचे चार विनंती मधील ज्ञान समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचायला हवे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाकडून अशा प्रकारची व्याख्यानमाला आपल्या महाविद्यालयामध्ये राबवण्यात येत असल्याचे त्यांनी व्यक्त केले. या व्याख्यानमालेची सुरुवात प्रा.मुबीन तांबोळी यांच्या ‘हास्य हंडी’ या विषयाने झाली. प्रा. मुबीन तांबोळी यांनी अत्यंत खुमासदार, विनोदी अंगाने सादरीकरण करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयाप्रती जागं करत त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली.या व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प जेष्ठ सिने अभिनेते गजानन पातुरकर यांच्या ‘विनोदातून समाज प्रबोधन’ या विषयावर झाले. विद्यार्थ्यांनी प्रवासामध्ये मोबाईलचा वापर टाळावा, विद्यार्थ्यांनी फास्टफूडच्या आहारी जाऊ नये, उत्तम आरोग्य सांभाळावे, आई-वडील आणि गुरुजन यांचा आदर करावा, त्यांना विसरू नये असे मौलिक विचार मांडले. या व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांनी गुंफले. आपल्या ‘तमाशा कला: विठाबाई ते गौतमी’ या विषयावर बोलताना मिलिंद कसबे यांनी “लावणी म्हणजे तमाशा नव्हे, तमाशा कला म्हणून महान आहे. भांडवलशाहीला हव्या असणाऱ्या कला आज जन्माला येत आहेत. अलीकडे तमाशाचा आर्केस्ट्रा झाला आणि आर्केस्ट्रा चा आता धिंगाणा झाला आणि त्या धिंगाणाचे नाव गौतमी पाटील झाले आहे ” अशी खंत व्यक्त केली.

See also  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या पुढाकाराने आणि समाजकल्याण विभाग, पुणे च्या वतीने आयोजित "शिष्यवृत्ती परिषद २०२३" संपन्न

या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे, प्रा. विजय घारे, प्रा. विक्रम मालतुमकर, सकाळ सत्र प्रमुख डॉ.वंदना पिंपळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. वर्षा खांदेवाले, डॉ. संगीता घोडके,डॉ. शिवाजी शेळके, डॉ.विजय बालघरे , डॉ.सुवर्ण खोडदे, डॉ. जितेंद्र वडशिंगकर,डॉ. अर्जुन डोके डॉ. भरत राठोड, डॉ. गोरक्षा डेरे, डॉ. नरसिंह गिरी, डॉ. ज्योती रामोड, प्रा.ज्ञानेश्वर जांभूळकर, प्रा. बालाजी मगर, प्रा.संतोष सास्तुरकर आदींनी आदींसह बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.