स्वत:ला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणवून घेणारे आता औरंगजेब  फॅन क्लबचे नेते झाले अमित शहा यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

पुणे : स्वत:ला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणवून घेणारे आता औरंगजेब  फॅन क्लबचे नेते झाले. अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावरती अमित शहा यांनी बालेवाडी येथील भाजपाच्या राज्य अधिवेशनात केली.

अमित शहा पुढे म्हणाले, नरेंद्र मोदींनी आंतकवादाला मुळापासून उपटून टाकण्यासाठी अनेक निर्णय घेतले. देशाच्या औरंगजेब फॅन देऊ सुरक्षा देऊ शकत नाही. औरंगजेब फॅन क्लब कोण आहे? तर इंडिया आघाडीवाले आहेत. त्यांचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. स्वत:ला बाळासाहेबांचे वारसदार म्हणणारे कसाबला बिर्यणी खाऊ घालणाऱ्यांसोबत आहेत. त्यांना लाज वाटलाय पाहिजेऔरंगजेब फॅन क्लब महाराष्ट्र आणि देशाला सुरुक्षित करू शकत नाही. देशाला आणि महाराष्ट्राला केवळ भाजप सुरक्षा देऊ शकते, असेही अमित शाह म्हणाले.

काँग्रेसवाले अनेक अपप्रचार करत आहेत. पण त्यांनी 60 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी काय केले? हे काहीही करू शकत नाही,

कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून दिला. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. महाराष्ट्रात 2024 मध्ये सर्वात मोठा विजय मिळवायचा. मी बऱ्याच पदाधिकाऱ्यांना काल भेटलो. थोडा गोंधळ वाटतोय याचं कारण म्हणजे विरोधकांना चुकीच्या गोष्टी पसरवल्या आहेत त्याचा आहे. तरी देखील आपला विजय झाला आहे. आपण जिंकलो पण विरोधक अहंकारी झाल्यासारखे दिसत आहेत.

अमित शहा म्हणाले, आपण जिंकूनही निराश असल्यासारखे वाटतोय. आणि दुसरीकडे पराभवानंतरही राहुल गांधी अहंकारी झालेत. भाजपला 240 आणि एनडीएला 300 मिळाल्या. हे लक्षात ठेवा. निवडणुकीत लोकांनी मोदींच्या दहा वर्षांच्या कामकाजावर मोहोर उमटवली. तरी देखील बहुमत मिळालं नाही याची खंत वाटतेय पण डोकं धरून बसू नका. आता विधानसभेत सगळी कसर भरून काढा. हताश होऊ नका. लोकसभेतील मोठा विजय आहे. महाराष्ट्रातही 2024 मध्ये सर्वात मोठा विजय होणार आहे. भाजपाच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येणार आहे.यासाठी संकल्प करा.

See also  एका महिन्यात 3 वेळा काम तरीही चेंबर नादुरुस्त पुणे पालिकेचे काम