महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांचा ‘पुण्यभूषण’ने गौरव

पुणे : पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने ज्येष्ठ शास्त्रज्ञ महासंगणकाचे जनक, पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांना गौरवण्यात आलं. इन्फोसिसचे संस्थापक-अध्यक्ष पद्मविभूषण नारायण मूर्ती, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष मा.श्री. प्रतापराव पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गौरव केला गेला. पुण्यभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. रघुनाथजी माशेलकर सर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे यंदा ३६ वर्षे ! यावेळी जायबंदी सैनिकांचा गौरवही यावेळी करण्यात आला.

पुण्यभूषण फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. सतीशज देसाई गेली ३६ वर्षे पुण्यभूषण पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरवत आहेत. फाऊंडेशनचा पुरस्कार कालानुरुप पुणेकरांच्या वतीनं देण्यात येणारा सन्मान झाला, हे या पुरस्काराचं सर्वात मोठं यश आहे.

पुण्याला ज्ञानाची दीर्घ परंपरा लाभली आहे आणि ही परंपरा वर्धिष्णू आहे. डॉ. भटकर पुण्याचे वैभव आहेत. विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या कार्याला अध्यात्माचे अधिष्ठान लाभले आहे’, अशा शब्दात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या.

यावेळी सीमेवर कर्तव्य बजावत असताना जायबंदी झालेल्या जवानांचा आणि वीरमाता विद्या बारपट्टे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळ्यास सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार, उद्योजक श्री. गजेंद्र पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  औंध परिसरात पोलीस गस्त वाढविणार -आमदार सिद्धार्थ शिरोळे