मुळशी तालुक्यात पीडब्ल्यूडी कार्यालयाच्या दारातच साठते पाणी, या विभागाकडून रस्ते दुरुस्ती अपेक्षा ठेवावी का? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सवाल

मुळशी : मुळशी तालुक्यात पी डब्लू डी कार्यालयाच्या दारात पाणी तुंबले आहे ही अवस्था आहे जर तालुक्यातील या कार्यालयाची अशी दयनीय परिस्थिती असेल तर नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची अपेक्षा शासनाकडून कशी करायची असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.

या विभागाचा कामाकाजाची दयनीय अवस्था आहे.  मुळशी तालुक्यात बांधकाम विभाग काम करते काय? हा मोठा प्रश्न पडला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुळशी तालुक्याचा वतीने निवेदन देताना देखील कुठलाच शासकीय अधिकारी उपस्थित नव्हता. हे नेहमीच झाले सदर कार्यालयास ताळे लावण्यात यावे अशी परिस्थिती सध्या या विभागाची झाली आहे. मुळशी तालुका शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील धरण भाग, कोळवण भाग मुठा विभागातील रोड ठीक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. त्वरित ते खडे बुजवून त्यांची दिरुस्थी करावी तसेच बरेच ठिकाणी साईड पट्या देखील भरून दुरुस्त कराव्यात सदर काम पंधरा दिवसांचा आत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे, ज्येष्ठ नेते नामदेव टेमघरे, युवासेना उपजिल्हाअधिकारी अमित कुडले, उपतालुकाप्रमुख अनंता वाशिवले, क्षेत्र प्रमुख शिवाजी भिलारे, उपतालुप्रमुख पांडुरंग निवेकर ,संजय ढमाले, यशवंत गवारी, नितीन लोयरे,मुकेश लोयरे उपस्थित होते.

See also  मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते बाणेर येथे मराठा सहाय्यक समिती कार्यालयाचे उद्घाटन