सुस गावठाण अंतर्गत खड्डे बुजवण्याचे काम सुरू माजी उपसरपंच अनिकेत उत्तम चांदेरे यांच्या पाठपुराव्याला यश

सुस : सुस गावठाण अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम माजी उपसरपंच अनिकेत उत्तम चांदेरे यांच्या पाठपुराव्यानुसार  सुरू करण्यात आले.

सुस परिसरातील सुस गावठाण येथील कैलास वर्मा ज्वेलर्स, ठकसेन नगर, आणि सुस-नांदे (सनी वर्ल्ड) रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात आले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सुसगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी मध्ये भर पडत होती. तसेच नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत होता.

गावठाण परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे काही प्रमाणात मुजवण्याचे काम सुरू करण्यात आल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटण्यास देखील मदत होणार आहे.

See also  नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे  वार्षिक स्नेहसंमेलन पंचतत्वांवर आधारित पर्यवरणपूरक संदेश देत यशस्वीपणे पार पडले