सुतारवाडी दफनभूमी मधील  मस्जिदच्या अनधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिकेची कारवाई

पाषाण : पाषाण सुतारवाडी येथील दफनभूमी मध्ये बांधण्यात आलेली अनधिकृत मस्जिद पुणे महानगरपालिकेने अतिक्रमण कारवाई करून हटवली.

जेसीबी कटर मशीन डंपर पोकलेन च्या साह्याने अनधिकृत मस्जिद हटवण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पाषाण कॉसमॉस चौक ते सुतारवाडी गिरीराज चौक पर्यंत रस्ते संरक्षणासाठी बंद करण्यात आले होते.

गेले अनेक वर्ष पुणे महानगरपालिकेच्या दफन भूमीमध्ये मज्जिद बांधण्यात आली होती. सुतारवाडी स्मशानभूमी लगतच मुस्लिम दफनभूमी असल्याने सातत्याने अनाधिकृत दफनभूमीतील बांधकाम पाडण्याची मागणी विविध संघटनांच्या माध्यमातून केली जात होती.

मुस्लिम दफनभूमीचा वापर हा धार्मिक कार्याच्या साठी करण्यात येऊ नये. यासाठी अनेकदा पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने कारवाई करत दफनभूमीतील अनाधिकृत बांधकाम हटवले. या कारवाईमध्ये पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभाग अतिक्रमण विभाग कर्मचारी व अधिकारी तसेच अग्निशामक दल व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर पुणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने अमरण उपोषण