बाणेर : पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी बाणेर येथील बाणेश्वर मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त दर्शन घेऊन मंदिर परिसराची माहिती घेतली.
यावेळी मंदिराच्या विश्वस्तांकडून महापालिका आयुक्त यांना मंदिराची ऐतिहासिक माहिती सांगण्यात आली. पांडवकालीन असलेली हे मंदिर शहरा लगत असल्याचे माहित नव्हते. त्याच्या दर्शनाचा लाभ आज भेटला अशी प्रतिक्रिया भोसले यांनी यावेळी दिली.
मंदिरात सुरू असलेल्या कामांची यावेळी आयुक्तांना माहिती देण्यात आली. बानेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आयुक्तांनी टेकडीवर असलेल्या तुकाई मातेचे मंदिराचे जाऊन आवर्जून दर्शन घेतले. तूकाई टेकडीवरून पूर्ण बाणेर निहाळण्याचा आनंद घेत विविध भागाची माहिती ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारली.
आज सोमवती अमावस्या व शेवटचा सोमवार असल्याने बाणेश्वर मंदिराच्या पिंडीला नंदी स्वरूपात शृंगार करण्यात आला होता. याप्रसंगी बाणेश्वर देवस्थान ट्रस्टचे संदीप वाडकर, सुधीर कळमकर, गणेश तापकीर आदी उपस्थित होते.