नारायण सदाशिव पेठ,  लक्ष्मी रस्त्यावरील श्री गजानन मंडळ आणि श्री गरुड गणपती ट्रस्ट ची एकत्रित विसर्जन मिरवणूकीची यंदा दशकपूर्ती

पुणे : पुण्यनगरीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शिरपेचात मानाचे स्थान असलेलं नारायण- सदाशिव पेठेतील लक्ष्मी रोडवरील अग्रणी मंडळ श्री गजानन मंडळ आणि श्री गरुड गणपती मंडळ. या दोन्ही मंडळांनी पुण्यनगरीच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत २०१५ रोजी दोन मंडळे एकत्र करून एकत्रितपणे काढलेली विसर्जन मिरवणूक यंदाच्या सलग १० व्या ही वर्षी मोठ्या आनंदाने काढण्यात येणार आहे, अशी माहिती श्री गजानन मंडळाचे अध्यक्ष राकेश गाडे पाटील, कार्याध्यक्ष अमेय गाडे पाटील आणि श्री गरूड गणपती मंडळ ट्रस्ट चे अध्यक्ष सुनिल कुंजीर, मंडळाचे मयूर कडू यांनी दिली.


विसर्जन मिरवणुकीत पुण्याच्या गणेशोत्सवात शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणूकीत समाजाला एक नवी दिशा देणारे हे दोन्ही मंडळांनी सामाजिकतेचे भान ठेवले आहे. पुणे शहराचे तत्कालीन पुणे शहर पोलिस आयुक्त यांनी केलेल्या आवाहनानुसार येथील दोन्ही मंडळांनी एकत्रित मिरवणूक काढण्याचा मानस केला, आणि तेव्हापासून आजपर्यंत सलग १० व्या वर्षी ही दोन्ही मंडळे एकत्रित मिरवणूक काढल्याने मिरवणूकीचा प्रशासनावरील ताण कमी होणार आहे.


दोन गणेश मंडळांनी एकत्रित मिरवणूक काढण्याने दोन मंडळांचे ढोल-ताशांचे पथक एकत्र राहणार आहे. दोन श्री गणरायांची मुर्ती एकाच गाड्यांवर असणार आहेत. त्यामुळे दोन मंडळामधील अंतर कमी होणार असून दोन्ही मंडळांचा खर्चावरील त्राण देखील कमी होणार आहे.
दोन्ही मंडळांनी धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा कायम जपली आहे. देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्यनगरीचा उल्लेख होत असताना सार्वजनिक गणेशोत्सवात अग्रणी असणार्या मंडळात श्री गजानन मंडळ आणि श्री गरूड गणपती मंडळांचे नाव मोठ्या मानाने घेतलं जातं. यंदाच्या २०२४ च्या या वर्षात हा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहाने साजरा होत असल्याचे गाडे आणि कुंजीर यांनी सांगितले. त्यामुळे
लक्ष्मीरोड वरील मानाचे स्थान असलेल्या हि दोन श्री गजानन मंडळाने दरवर्षी प्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रणी असल्याचे गाडे, कडू आणि कुंजीर यांनी सांगितले.

See also  किल्लेदार भाजी मार्केट सुसज्ज करा आमदार शिरोळे यांची सूचना