बाणेर : बाणेर येथील बांधकाम व्यावसायिकाच्या गुंडांनी धमकी दिल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस स्टेशन येथे दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बाणेर येथील संतोष जगदीश लोंढे राहणार बाणेर सर्वे नंबर 5 यांना बांधकाम व्यवसायिकाच्या विरोधात तक्रारी का दाखल करतो असा फोन करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
बांधकाम व्यावसायिक कैलास बाबुलाल वाणी यांच्या विरोधात संतोष लोंढे यांनी वडिलोपार्जित जागेवर झालेल्या अतिक्रमणा विरोधात उपोषण केले होते. याचा जाब विचारत बाळासाहेब पाटोळे व देशमुख पाटील यांनी संतोष लोंढे यांना फोन करून धमकावत तू राकेश भरणे ला ओळखतो का? 2007 साली महाळुंगे येथे काय झाले होते माहिती आहे का? अशाप्रकारे बोलत धमकावण्याचा प्रकार केला.
संतोष लोंढे बाणेर येथील सर्वे नंबर पाच ही वडिलोपार्जित मिळकत असलेल्या ठिकाणी राहत असून जागा बांधकाम व्यावसायिकाला दिले नसताना देखील या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक जागा लाटत असल्याचा आरोप करत लोंढे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते.
यानंतर सातत्याने विविध माध्यमातून लोंढे यांना धमकावण्याचे प्रकार होत आहेत. तसेच स्वतःच्या जागेतून बाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याने बांधकाम व्यावसायिका विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करण्यात यावी व दलित कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी मागणी मांग गारूडी समाज महासंघाच्या व आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.
घर ताज्या बातम्या बांधकाम व्यवसायिकाच्या गुंडांनी धमकवल्या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस स्टेशन येथे दोघां विरोधात गुन्हा...