पुणे – महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचालित शाळांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे. पुणे, कोळविहिरे, कोंढवा आणि बारामती येथील चारही शाखांचा निकाल अत्यंत समाधानकारक लागला असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षकांचे परिश्रम अधोरेखित करणारा ठरला आहे.
अशोक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, टिळक रोड, पुणे या शाळेचा निकाल 93.33 टक्के लागला आहे.
या शाळेतील नाईक शौर्या पुष्कर हिने 97.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. गायकवाड आरव किशोर (90.80%) आणि देशपांडे विहान विशाल (90.20%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.या यशाबद्दल मुख्याध्यापिका उर्मिला केशव भोसले यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
महर्षी वाल्मिक विद्यालय, कोळविहिरे या ग्रामीण भागातील शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यार्थिनी मस्के नम्रता रोहिदास हिने 83 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या यशामागे शाळेच्या शिक्षकवृंदासह मुख्याध्यापक अशोक चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे.
जडाबाई दुगड विद्यालय, कोंढवा या शाळेने 94.18 टक्के निकालाची नोंद करत उत्तम कामगिरी बजावली आहे.
मुख्याध्यापिका जयश्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली शाळेने हे यश संपादन केले.
शारदा निकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, बारामती या शाळेने 100 टक्के निकालाची नोंद केली असून विद्यार्थिनी खक्कल प्रतीक्षा महेश हिने 81.5 टक्के गुण मिळवत यश मिळवले आहे.
मुख्याध्यापक खान शबान यांचे मार्गदर्शन शाळेच्या गुणवत्तापूर्ण यशामागे आहे.
या सर्व यशस्वी निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. मोहनदादा जोशी, सचिव प्रसाद आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, संचालक गौरव आबनावे व प्रज्योत आबनावे यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले.
संस्थेचे सचिव प्रसाद आबनावे यांनी याप्रसंगी सांगितले, “निकाल ही केवळ शैक्षणिक टक्केवारी नव्हे, तर संस्थेच्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीचे प्रतीक आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच शिक्षक व शाळा व्यवस्थापनाच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.”
या यशस्वी निकालामुळे मंडळाच्या शाळा गुणवत्तेच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत असल्याचा विश्वास पालक व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
घर साहित्य/शैक्षणिक महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचालित शाळांचा उज्ज्वल निकाल – गुणवत्तेची परंपरा कायम