जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने रस्त्याचे रुंदीकरण

बाणेर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरुड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने बाणेर येथील नंदन अक्युरा सोसायटीच्या रस्त्याचे रुंदीकरण करून घेण्यात आले आहे.

सदर रस्त्याच्या कडेला झाडे झुडुपे वाढल्यामुळे तब्बल गेल्या 10 वर्षांपासून रस्ता अरुंद झाला होता. यादरम्यान एकही लोकप्रतिनिधीकडून याची दखल घेतली गेली नव्हती.

ही बाब जयेश मुरकुटे यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी लगेच जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने स्वखर्चातून सदर रस्त्याच्या कडेला असलेली झाडे झुडुपे काढून रुंदीकरण करण्यात आले.

याद्दबल येथील नागरिकांनी समाधान व्यक्त करत जयेश मुरकुटे यांचे आभार मानले. तसेच परिसरातील इतर समस्यांचा पाढा वाचला. यावेळी सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा शब्द यावेळी जयेश मुरकुटे यांनी दिला.

See also  तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान