कोथरूड व्यापारी संघाच्यावतीने शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना पाठिंबा

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीला कोथरूड व्यापारी संघाच्यावतीने चंद्रकांत मोकाटे यांना पाठिंबा देण्यात आला.

व्यापारी, दुकानदार, लघु व्यावसायिकांपासून ते मोठया दुकानदारांच्या समस्या सोडवण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हेच प्रयत्न करू शकतात असे आवाहन कोथरूड व्यापारी संघांचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी सांगितलं.
कोथरूड व्यापारी संघांचे व्यापारी सदस्यांची चंद्रकांत मोकाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक झाली.

या बैठकीत चंद्रकांत मोकाटे, जयेश खक्कर, शांताराम अमराळे  दिलीप चोरगे, सुनिल लोटलीकर, कैलास परमार, बगाराम चौधरी दादासाहेब भेलके, सचिन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री चव्हाण म्हणाले की, कोथरूड विधानसभा मतदारसंघात 5,800 व्यापारी आहेत. या व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी श्री मोकाटे आम्हाला अनेक वेळा मदत करतात आमच्या व्यापारी व दुकानदारांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीच हवा. ते कोणत्याही वेळेला आमच्यासाठी  उभे राहतात.

चंद्रकांत मोकाटे म्हणाले, दुकानदारांच्या समस्या सोडवण्याण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे. संपर्कात राहणारा लोकप्रतिनिधी म्हणून माझी ख्याती आहे. यामुळे सर्व वर्गातील समस्या सोडवण्यासाठी माझा प्रयत्न राहील.

See also  स्वराज्य पक्षाच्या वतीने विश्रांतवाडीमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी भक्तांची सेवा.