वसुंधरा अभियान चित्रकला महोत्सवात हजारो विद्यार्थ्यांनी घेतला निसर्गात चित्र काढण्याचा आनंद

बाणेर : तूकाई टेकडी बाणेर, या ठिकाणी वसुंधरा अभियान संस्थेमार्फत दहावे निसर्ग चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. परिसरातील 37 शाळा मधील 1160 विद्यार्थ्यांनी या महोत्सवामध्ये भाग घेऊन, निसर्ग चित्र ,निसर्गात जाऊन काढण्याचा आनंद घेतला .


वसुंधरा अभियान मार्फत तुकाई टेकडी बाणेर येथे 2006 पासून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हे पर्यावरणाचे काम चालू असून ,संस्थेने लोकसहभागातून आत्तापर्यंत 47 हजार पेक्षा जास्त देशी झाडांची लागवड केली आहे. त्याकरिता महाराष्ट्र शासनाने त्यांचा श्री शिवछत्रपती वनश्री पुरस्कार देऊन सन्मान देखील केला आहे.
वसुंधरा अभियान माध्यमातून चालू असलेले काम पुढच्या पिढीपर्यंत कळावे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी दरवर्षी वसुंधरा सदस्यांकडून टेकडीवर,  सकाळच्या सुंदर रम्य वातावरणात विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते.


संस्थेचे हे  चित्रकला आयोजनाचे दहावे वर्ष असून, परिसरातील हजारो विद्यार्थी सहभाग घेऊन चित्रकलेचा मनमुराद आनंद घेतला.
चित्र काढण्याचा आनंदा बरोबरच सर्व विद्यार्थ्यांना नाष्टा तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे संस्थेकडून वाटप गणेश कळमकर, वसुंधरा अभियानचे सदस्य यांच्या करण्यात आले. विद्यार्थ्यांचे चित्र परीक्षण श्री खैरनार सर व यांच्या टीमने निःपक्षपाती केले.

See also  ...अन त्या दोघा भावांची शाळा पुन्हा सुरू झाली! - गणेश भोकरे यांनी शैक्षणिक शुल्क भरत जपली निवडणूक काळातही सामाजिक बांधिलकी