बालेवाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संविधान पूजन व हळदीकुंकू समारंभाचे 25 जानेवारी रोजी आयोजन

बालेवाडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बालेवाडी येथे महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन शनिवार 25 जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ७ वाजता बालेवाडी दसरा चौक येथे करण्यात आले आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पूर्वसंध्येला भारत माता व संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात येणार आहे.

बाणेर बालेवाडी सुस परिसरातील महिलांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तसेच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ऋतुजा मनोज भांडे, नेहा मयूर भांडे, संगीता बडगुजे, रोहिणी जाधव, पूजा गायकवाड, स्वाती काळे, उमा देवकाते यांनी केले आहे.

शिवसेना नेते बाळासाहेब भांडे, युवा सेना उपशहर प्रमुख मयूर भांडे तसेच बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे पाषाण परिसरातील शिवसेनेचे व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

See also  महिला दिनानिमित्त यश ताम्हाणे यांच्या वतीने बाणेर परिसरातील 8 महिलांना मोफत कॉम्पुटर क्लास ची सोय