अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधात गुन्हा दाखल करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करून सामाजिक अशांतता पसरवणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली.

याप्रसंगी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, युवराज पारीख, उपशहरप्रमुख आबा निकम, राम थरकूडे, युवराज पारीख. प्रवीण डोंगरे, उमेश वाघ,अनिल दामजी, राजेंद्र शाह, मुकुंद चव्हाण, अजय परदेशी, सूरज लोखंडे, नितीन परदेशी उपस्थित होते.


           महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम जनतेच्या मनात आदराची त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची, शौर्याची व किर्तीची भावना आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेउन जीवनाची वाटचाल जनतेने ठरवलेली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात, परदेशात त्यांच्या कार्यशैलीवर अभ्यास केला जातो, स्वराज्याची राजधानी रायगड येथील माती परदेशातील नागरिक व संस्था येथून घेउन जातात आणि आपल्या देशातील मातीत मिसळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधीचा, पराक्रमाची व गनिमी काव्याचा अभ्यासक्रम अनेक देशातील शाळामधे विकलेले जातो.

            अशा विश्वव्यापी, गौरवशाली महापुरुषा बद्द्ल मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर याने एका पॉडकास्ट कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यासाठी अनेकांना लाच दिली होती. असे वक्तव्य केले असून ह्या वक्तव्यामुळे शिवप्रेमी जनतेमधील प्रचंड चीड निर्माण झाली आहे. शिवाजी महाराजांचा परिक्रमेत पुसण्याचे काम या समाजकंटकांनी होत आहे. यामुळे महाराष्ट्रातील वातावरण दूषित झाले आहे, विनाकारण दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे, तसेच पोलीस प्रशासनावरही ताण वाढला आहे, समाजविघातक कृत्य केले आहे. त्यामुळे सदर व्यक्तीवर आपण तत्पर सामाजिक तेढ निर्माण करणे, महापुरुषांचा अपमान करणे, सामाजिक सलोखा बिघडविणे, ह्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच त्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागावी अशी व्यवस्था आपल्या मार्फत व्हावी. अन्यथा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या सन्मानार्थ सोलापूरकरला अटक होउन गुन्हे दाखल करेपर्यंत सातत्याने आंदोलनं घ्यावे लागेल. असे निवेदन शिवसेनेच्या वतीने पोलीस आयुक्त यांना देण्यात आले.


See also  'साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार २०२४' जाहीर