औंध डि.पी.रोड मध्ये माता.रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाडू वाटप करुन बहुजन उद्धारक सामाजिक संस्थेच्या वतीने जयंती साजरी

औंध : औंध डि.पी.रोड या ठिकाणी बहुजन उद्धारक सामाजिक संस्थेच्या वतीने माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला.सौ.भारती जगताप (अंगणवाडी शिक्षका )यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी छायाताई ठोसर, हिराबाई घोडेराव, निवेदिता वाघमारे , स्मिता कांबळे, भारती परदेशी ,सौ.गायकवाड ताई , अजय निरवणे, सुबराव ठोसर, निलेश ठोसर, दिनेश ठोसर, इत्यादी महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. जयंतीनिमित्त लाडू वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन रमेश ठोसर (बहुजन उद्धारक सामाजिक संस्था )यांनी केले होते .

See also  पुण्याची मुंबई होऊ नये यासाठी हडपसर येथे जनजागृती अभियान