राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ‘स्ट्रीट थिएटर’ स्पर्धेत सिंहगड इन्स्टिट्यूट ने प्रथम क्रमांक पटकावला

पुणे : राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ‘स्ट्रीट थिएटर’ स्पर्धेत सिंहगड इन्स्टिट्यूट ने प्रथम क्रमांक पटकावला.कर्मवीर करंडक, ही स्पर्धा रयत शिक्षण संस्था गेल्या ५ वर्षांपासून आयोजित करत आहे. सलग दुसऱ्या वर्षी नेत्रदीपक कामगिरी करत पुन्हा एकदा सिंहगड चा झेंडा रोविला गेलाय. या राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण ३२ महाविद्यालयांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या मध्ये सामाजिक सेवेचे बीज रोवले जावे हे ह्या स्पर्धेचे उद्दिष्ट होते. कर्मवीर करंडक या स्पर्धेत अव्वल कामगिरी करत “सिंहगड कलामंडळच्या” श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यायाच्या संघाने ने प्रथम क्रमांक पटकाविला .’कर्मवीर’ करंडक ह्या आंतरमहाविद्यालयीव पथनाट्य स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांनी विजय प्राप्त केला आहे. सिंहगड कलामंडळ चे प्रमुख वैभव वासणकर आणि  अपूर्वा चतुर्वेदी यांनी  मार्गदर्शन केले.


श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ” फंदा ” हे नाटक सादर करून सिंहगड चा झेंडा राज्यस्तरावर उंचावला. संस्थेचे अध्यक्ष प्रा.एम.एन.नवले,  संस्थापक सचिव डॉ.सुनंदा नवले, उपाध्यक्षा रचना नवले अष्टेकर, उपाध्यक्ष डॉ. रोहित नवले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी डॉ.अरविंद देशपांडे, डॉ. के.आर बोरोले, प्रा.अमृत पाटील, प्रा. रविंद्र बोऱ्हाडे हे उपस्थित होते. या विद्यार्थी संघाचे नेतृत्व अभिषेक बडगुजर, रविना जाधव यांनी केले.

See also  महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीचे शरद पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन