दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात पती पत्नी गंभीर जखमी
बहुळ येथील घटनाः‍‌‌‍ गावात भीतीचे वातावरण

चाकणः बहुळ (ता खेड)येथील दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात दोन जण पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. दरोडेखोर घरातील दोन तोळे सोन्याच्या दागिन्यासह सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल चोरून पसार झाले आहेत. रविवारी (23 फेब्रुवारी) मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास ही घटना घडली असून पिंपरी चिंचवड पोलीस दरोडेखोरांचा कसून शोध घेत आहेत. गंभीर जखमी पती-पत्नीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आसून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.अशोक जयराम वाडेकर ( वय 35) आणि उज्वला अशोक वाडेकर (वय 32) असे गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे.

जयराम लक्ष्मण वाडेकर (वय 67) हे पत्नी शालन( वय 65) आणि मुलगा अशोक ,सून उज्वला आणि दोन नातवांसह सिद्धेगाहून रोडवरील फुलसुंदर वस्ती येथे राहतात. जयराम हे शेती करतात तर मुलगा सणसवाडी येथील एका कंपनीत नोकरी करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक आणि उज्वला रविवारी दर्शनासाठी शिवनेरी येथे गेले होते. रात्री दहा वाजता आल्यानंतर त्यांनी जेवण करून झोप घेतली. मध्यरात्री अचानक पाच-सहा चोरट्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. हॉलमध्ये झोपलेल्या जयराम यांना पत्र्याच्या पेटीचा आवाज आल्याने त्यांना जाग आली. त्यांनी पाहिले असता वीस ते पंचवीस वयोगटातील एक काळा सावळा चोरटा त्यांच्याजवळ धारदार चाकू घेऊन बसला होता. ॓गप्प रहा, नाहीतर चाकूने भोकसतो॔ ॑ अशी धमकी देत त्याने जयराम यांना जागेवरून हलण्यास मज्जाव केला.
याची वेळी इतर दोन चोरटे घरातील कपाटे आणि पेट्या फोडत होते. यावेळी हॉलमध्ये झोपेतून जाग आलेल्या शालन वाडेकर यांनी घाबरत चोरट्यांना ॓काय घ्यायचे ते घ्या पण आम्हाला मारू नका॔ अशी विनवणी केली. तरीही चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतले.

जयराम आणि शालन यांचे दागिने काढून घेतल्यानंतर चोरट्यांनी बेडरूम मध्ये झोपलेल्या अशोक आणि उज्वला यांचा बेडचा दरवाजा कटवणीच्या साह्याने तोडून आत प्रवेश केला. अचानक झालेल्या आवाजाने अशोक आणि उज्वला यांना जाग आली. त्यांनी प्रतिकार करताच चोरट्यांनी थेट त्यांच्या पोटात चाकू भोकसला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दांपत्याने मदतीसाठी आरडा ओरडा करून याचना केली. त्यावेळी शालन वाडेकर यांनी मदतीसाठी धाव घेतली असता चोरट्यांपैकी एकाने त्यांना काठीने मारहाण केली. यामध्ये चोरट्यांनी एक लाख 32 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि बारा हजार रुपये रोख रक्कम लंपास करून घाई घाईने पोवारा केला. जाताना त्यांनी घराची बाहेरून कडी लावली.

See also  सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराचे वितरण

गावात भीतीचे वातावरण

या धक्कादायक घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक प्रशासन हादरले आहे. गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप तयार झाले आहे. घटनास्थळी चाकण पोलीस स्टेशन आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी धाव घेतली असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

सीसीटीव्ही फुटेज मध्ये दरोडेखोर

रविवारी मध्यरात्री दरोडेखोर बहुळ गावातील सिद्धेगव्हाण रोडवरील भगवान तांबे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात आले असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यांचा सुगावा लागल्याने भगवान तांबे यांनी सावध होऊन आवाज दिल्यानंतर दरोडेखोरांनी पळ काढल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.
त्यानंतर ते जवळच असलेल्या फुलसुंदर वस्ती येथील जयराम वाडेकर यांच्या घरावर दरवाजा तोडून दरोडा टाकला.

तत्पूर्वी त्यांनी आजूबाजूच्या शेजारील पाच सहा घरांचे दरवाजाच्या कड्या बाहेरून लावून घेतल्या होत्या.
दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाने त्यांचा मार्ग काढला आहे. तर घरातील सात ठिकाणच्या फिंगरप्रिंट घेण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे दरोडा प्रतिबंधक पथकासह पोलीस ठाण्याचे पथक दरोडेखोरांचा कसून शोध घेत आहेत.
प्रमोद वाघ,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस ठाणे