औंध मध्ये मनसेच्या वतीने ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ अभियान

पुणे : औंध मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर छत्रपती शिवाजीनगर आयोजित जागतिक मराठी भाषा गौरव दिवस व कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस या निमित्ताने ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ हे अभियान राबविण्यात आले.

मराठी भाषे करीता ती टिकावी या करीता  राज ठाकरे कायम स्वरुपी प्रयत्न शील आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून देण्यात  राज ठाकरे यांचा मोठा वाटा आहे. आपली भाषा टिकून राहावी या करिता आपण प्रयत्नशील असणे गरजेचे आहे असे मत यावी वागस्कर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी पुणे शहर अध्यक्ष श्री साईनाथ बाबर, मनसे नेते श्री.राजेंद्र वागस्कर  तसेच ज्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन झाले ते महाराष्ट्र प्रदेश नेते श्री. रणजित शिरोळे, श्री सुहास निम्हण, श्री नरेन्द्र तांबोळी, विभाग अध्यक्ष विनायक कोतकर, महिला विभाग अध्यक्षा सौ जयश्री मोरे, निलेश जुनवणे, अमर आढाळगे, मयूर बोलाडे पत्रकार बांधव आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन सौ.जनाई दत्तात्रय रणदिवे तसेच श्री दत्तात्रय विठोबा रणदिवे यांनी केली.

See also  राज्यात अवकाळी पावसामुळे अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे