खडकवासला येथील धरण चौपाटी जवळ पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल)चालत्या बसला आग लागून खाक

खडकवासलाः खडकवासला येथील धरण चौपाटी जवळील डीआयएटी गेट जवळ सिंहगड रस्त्यावर पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल)चालत्या बसला आग लागून खाक झाली. गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या  लक्षात आल्याने चालकाने प्रसंगावधान राखून गाडी वेळीच बाजूला घेऊन प्रवाशांना खाली उतरवल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. बस स्वारगेट वरून खानापूरला चालली होती

प्रवासी घेऊन खानापूर  जाण्यासाठी स्वारगेट वरून पीएमपींची बस एक वाजता निघाली होती. गाडीमध्ये साधारण 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते. सिंहगड रस्त्यावरील खडकवासला चौपाटी येथील डीआयएटी  गेट जवळ बस आल्यावर  गाडीतून धूर निघत असल्याचे चालक फिरोज शेख यांच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत चालक फिरोज शेख यांनी गाडी बाजुला घेतली.  सर्व प्रवाशांना खाली  उतरण्यास सांगितले. तोपर्यंत गाडीतून निघणाऱ्या धुराचे  प्रमाण वाढले होते.  प्रवासी उतरताच गाडीने एकदम पेट घेतला . चालक फिरोज शेख यांनी तत्काळ अग्निशमन दलाला बसला लागलेल्या आगीची घटना कळवली. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करत  आग आटोक्यात आणली. यासाठी पीएमआरडीए च्या अग्निशमन दलाचे अग्निशमन विमोचक ज्ञानेश्वर बुधवंत, प्रोज्योत  कोरडे आणि वाहन चालक प्रेमसागर राठोड यांनी  प्रयत्न केले.

निघाल्यापासून बसला वेगच नव्हता
बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले की बस निघाल्यापासूनच गाडीतून वेगळाच आवाज येत होता आणि बसला वेग ही नव्हता. तरीही गाडी भर उन्हात निघाली. धायरीच्या पुढे बस निघाल्यानंतर बसचा वेग आणखीनच मंदावला होता  तर चालक बस खूपच रेस करत होता. डी आय टी गेट जवळ बस आल्यानंतर बस मधून निघणारा धूर आणि जळका वासही वाढला होता. त्यानंतर काही क्षणातच बसणे पेट घेतला.

See also  विजय डाकले यांनी केला नऊ रिक्षा चालकांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ, त्यांना "रिक्षा" हे चिन्ह मिळाले आहे