बाणेर बालेवाडी काँग्रेस पक्षाच्या वतीने पहेलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातील मृत्यू पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली व हल्ल्याचा जाहीर निषेध

बाणेर : बाणेर बालेवाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जीवन चाकणकर शहर उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली काश्मीर येथील पहेलगाम मधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू पडलेला  नागरिकांना हाय स्ट्रीट बालेवाडी येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून निषेध व्यक्त केला .

यावेळी जीवन चाकणकर, अमर लोंढे, पवन  खरात, ओम बांगर, श्रुती चाकणकर, मंदार चाकणकर, अभिजीत वानखेडे,  बाणेर पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बाणेर बालेवाडी परिसरातील नागरिक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्धशेतकऱ्यांनी खतांचा समतोल वापर करावा-कृषि आयुक्त सुनील चव्हाण