महिला सक्षमीकरणाच्या अनोख्या साडी रन उपक्रमास महिलांचा  उस्फुर्त  प्रतिसाद

पुणे: महिला सक्षमीकरणाच्या अनोख्या साडी रन उपक्रमास महिलांचा  उस्फुर्त  प्रतिसाद मिळाला असून तनाएरा सारी रन ने पारंपरिक आणि आधुनिक फिटनेसचे संपूर्ण एकत्रीकरण करण्यावर भर दिला संस्कृती आणि वारसा यांचे प्रतिबिंब असलेली साडी सक्रिय आणि आधुनिक जीवन शैलीसाठी अतिशय अनुरूप ठरू शकते हे यावेळी प्रदर्शित करण्यात आले.


टाटा समूहातील एक ब्रँड तनाएराने जे जे ऍक्टिव्ह या बंगलोरमधील नामांकित कंपनीसोबत हातमिळवणी करून एका वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करत साड्यांच्या कालातीत सौंदर्याची नवी व्याख्या रचली रविवारी सकाळी पुणे विद्यापीठाच्या आवारात एक आगळावेगळा उत्साह संचारला होता महिला वेगवेगळ्या उठावदार रंगांच्या साड्या परिधान करून ताकद स्त्रीत्व स्वातंत्र्य आणि फिटनेसचा सन्मान करण्यासाठी एकत्र आल्या होत्या तनाएराचे सीईओ श्री अंबुज नारायण आणि जे जे ऍक्टिव्हचे कोच श्री प्रमोद यांनी या उपक्रमाचे उदघाटन केले.


तनाएरा सारी रन ने पारंपरिक आणि आधुनिक फिटनेसचे संपूर्ण एकत्रीकरण करण्यावर भर दिला संस्कृती आणि वारसा यांचे प्रतिबिंब असलेली साडी सक्रिय आणि आधुनिक जीवन शैलीसाठी अतिशय अनुरूप ठरू शकते हे यावेळी प्रदर्शित करण्यात आले या उपक्रमामध्ये शान आणि सक्षमता यांची सांगड घालून महिलांना स्टिरी ओटाइप्सना आव्हान देण्यासाठी वमर्यादांच्या पलीकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलेया आधी कोलकाता पुणे बंगलोर आणि हैदराबाद या शहरांमध्ये अतिशय यशस्वी ठरलेल्या या उपक्रमाने सामाजिक एकता फिटनेस फॅशन आणि व्यक्तिगत अभिव्यक्ती यांना चालना दिली साडी हे फक्त एक परिधान नाहीतर शान परंपरा आणि वैयक्तिक अभिरुची व शैली यांचे बहुमुखी प्रतीक आहे जे महिलांना स्वतःची अनोखी शैली फक्त खासप्रसंगीच नव्हे तर रोजच्या रोज व्यक्त करता यावी यासाठी प्रोत्साहित करते.
तनाएराचे सीईओ श्री अंबुज नारायण यांनी यावेळी सांगितले तनाएरामध्ये आम्ही साडी हे स्त्रीत्वाची व सक्षमतेची अभिव्यक्ती आहे असे मानतो आणि तिचा सन्मान करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत सारी रन हा उपक्रम साडीची शान अधोरेखित करतो इतकेच नव्हेतर आधुनिक सक्रिय जीवनशैलीचा आवश्यक भाग म्हणून साडी लानवा अर्थप्राप्त करून देण्यासाठी बांधील आहोत जे जे ऍक्टिव्हसोबत आमच्या सहयोगाने ही बांधिलकी अधोरेखित करता आली आहे गतिशील जीवनशैली आणि व्यक्तिगत अभिव्यक्ती यांची सांगड साडी सुंदर पद्धतीने घालू शकते हे यामधून दर्शवले जात आहे स्वतःची ताकद आणि व्यक्तित्व ठामपणे अभिव्यक्त करत असताना वारसापुढे नेण्यासाठी महिलांना प्रेरणा द्यावी हा या उपक्रमामागचा आमचा उद्देश आहे.
जे जे
ऍक्टिव्हचे कोच श्री प्रमोद यांनी सांगितले साडी रनची सुरुवात आठ वर्षांपूर्वी बंगलोरमध्ये झाली गेली दोन वर्षे तनाएराच्या सहयोगाने हा उपक्रम स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे आज तनाएरा सारी रन हा उपक्रम ठामपणे सांगतो की महिलात्यांच्या आरोग्याला प्राधान्य देताना सक्षमता समावेशकता आणि कल्याणावर भर देताना त्यांच्या अनोख्या शैलीचा सन्मान करू शकतात.

See also  मारुंजी येथील रास्तभाव दुकानातील विविध सेवांचा शुभारंभरास्तभाव दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देणार- अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण