पुढील चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टाचे आदेश

पुणे : मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संबंधित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भामध्ये निर्देश दिले आहेत. ‘चार महिन्यांमध्ये निवडणुका घ्या’असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.

यामुळे विधानसभेनंतर प्रतीक्षेत असलेली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे निघून लवकरात वाजणार हे निश्चित झाले आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पूर्वी निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले असून 2022 पूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला आहे त्यांच्या निवडणुका जुन्या ओबीसी आरक्षणा नुसार घेण्यात येतील. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची बहुप्रतिक्षित असलेली निवडणूक लवकरच होणार हे मात्र निश्चित झाले आहे.

See also  पुण्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराची तुकडी तैनात