बाणेर येथील विमल शंकरराव विधाते यांचे निधन; योगीराज पतसंस्थेच्या,राजेश विधाते याना मातृशोक

बाणेर : बाणेर येथील योगीराज पतसंस्थेच्या उपाध्यक्ष श्री राजेश शंकरराव विधाते यांच्या मातोश्री श्रीमती विमल शंकरराव विधाते यांचे दिनांक ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता अल्पशा आजारामुळे निधन झाले.
त्यांच्या मागे संजय विधाते, NSUI चे माजी पुणे शहर अध्यक्ष,
राजेश विधाते योगीराज पतसंस्थेचे उपाध्यक्ष व मुलगी वंदना नाखते असा परिवार आहे.


बाणेरचे माजी सरपंच कै अर्जुनभाऊ विधाते यांच्या वहिनी
व माजी सरपंच श्रीरंगराव विधाते यांच्या त्या चुलती होत्या
अर्जुनभाऊ विधाते हे सामजिक व राजकिय क्षेत्रात काम करत असताना त्यांचे बंधू कै शंकरराव विधाते यांनी कुटुंबियांची शेती अतिशय सचोटीने केली. दुर्दैवाने कै शंकरराव यांचे १९८१ साली निधन झाले. आपल्या पतीच्या पश्यात कै. विमल विधाते यांनी कुटुंब ची शेती सांभाळली. व आपल्या  सर्व मुलांचे पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यांची दोन्ही मुले शेती तसेच व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत. बाणेर येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

See also  विद्यार्थी हितासाठी  "कॅरी ऑन योजनेसदर्भात " विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घ्यावा - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील