डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचा निकाल १०० टक्के गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

येरवडा पुणे : सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय (इंग्रजी व मराठी माध्यम) व ज्युनियर कॉलेजचा इयत्ता १० वी व १२ वी चा निकाल यंदाही १०० टक्के लागला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

१० वी मराठी माध्यमातून कोमल सवदे (९०.२०%) प्रथम, अदाटे अश्विनी (८०.००%) द्वितीय व अखाडे संकेश (६९.८०%) तृतीय आले. बहिःस्थ विद्यार्थ्यांमध्ये लव्हे आदर्श (५१.६०%) प्रथम व गायसमुद्रे निशा (५०.६०%) द्वितीय आली.

इंग्रजी माध्यमात मोर्या प्रिन्स (९५.८०%) प्रथम, वर्मा कोमल (९२.००%) द्वितीय आणि चव्हाण काया (९१.४०%) तृतीय आली. बहिःस्थ गटात गोरतळा असिथा (७५.८०%), राऊत आरती (७४.८०%) व चव्हाण काया (७३.६०%) अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकांवर आहेत.

१२ वी सायन्स (रेग्युलर) मध्ये श्रेया पाटील (७९.८३%) प्रथम, शुभ्रा यशवंतराव (७९.१७%) द्वितीय व सिद्धेश ढेबे (७६.३३%) तृतीय आले. बहिःस्थ सायन्समध्ये अजित घायतिडक (७३.६०%) आणि कॉमर्स बहिःस्थमध्ये आकाश ब्रम्हराक्षे (५१.००%) यांनी यश मिळवले.

मुख्याध्यापिका सौ. विद्या पाटील, सौ. अनामिका कुलकर्णी व श्री. विशाल वाघमारे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. शाळेतील सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हा निकाल शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील व उपाध्यक्ष अनुराग पाटील यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

See also  पुण्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ "आप" चे आंदोलन