योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचा २९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

बाणेर : योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या बाणेर शाखेचा २९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी पै. विराज रानवडे यांचा “कुमार भारत केसरी 2025” विजेतेपद मिळविल्याबद्दल तर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक दिलीप फलटणकर यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वार्षिक ग्रंथ पारितोषिक मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सहकार भारतीचे मा. अध्यक्ष मुकुंदराव तापकीर, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सभासदांना 30 लाख रुपये कर्ज वितरण आणि संस्थेच्या कर्मचार्‍यांना प्रत्येकी 20 हजार शैक्षणिक अनुदान मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे सभासद, खातेदार, हितचिंतक आणि मित्र परिवारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमाची सुरुवात हम होंगे कामयाब या गीताने स्वप्निल ठाकूर या कलाकाराने विविध वाद्य एकत्रित वाजवून केली.

संस्थेेचे संस्थापक, अध्यक्ष माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या मनोगतात त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेच्या दोन शाखा असून ठेवी 155 कोटी, कर्ज 118 कोटी, एकत्रित व्यवसाय 273 कोटीच्या पुढे झाला आहे तर निव्वळ नफा 3 कोटी 84 लाख रुपये झाला आहे. संस्थेने समाजातील सर्व स्तरांतील लोकांपर्यंत आपली सेवा पोहोचवली आहे, याचा त्यांनी उल्लेख केला. तसेच, आगामी काळात संस्थेच्या विकासासाठी असलेल्या योजनांविषयी माहिती दिली. संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवून गोर गरिबांना मदत करत असते. संस्थेला नुकताच मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दलही माहिती देण्यात आली.संस्थेने केलेले सामाजिक कार्य आणि सभासदांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली, ज्याला उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला.

याप्रसंगी भंडारा डोंगर ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक मंगेश देशपांडे, अभिनव शिक्षण संस्थेचे अशोक मुरकुटे, खंडेराय शिक्षण संस्थेचे गणपत बालवडकर, राहुल बालवडकर, रामदास मुरकुटे, डॉ. राजेश देशपांडे, राजेंद्र आचलारे, नामदेव गोलांडे, सोपान पाडाळे, ह.भ.प. संजय बालवडकर अनिल बालवडकर, लहु बालवडकर, नारायण चांदेरे, दत्तात्रय तापकीर, संग्राम मुरकुटे, जयेश मुरकुटे, इक्बाल शेख, सुनिल जाधव, शहाजी रानवडे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, शंकरराव सायकर, संचालक गणेश तापकीर, संचालिका रंजना कोलते, अलका सिरसगे, माजी संचालक खंडूजी मांडेकर, अशोक रानवडे, वसंत माळी, अमर लोंढे, शाखा समिती सदस्य पांडुरंग कदम, परिसरातील विविध बँकांचे प्रतिनिधी, तसेच खातेदार व संस्थेचा सर्व स्टाफ उपस्थित होते.

See also  कचरा वेचकांसाठी केंद्र सरकारच्या 'NAMASTE' योजनेची  अंमलबजावणी करणारे पुणे ठरले देशातील पहिले शहर

संस्थेचे तज्ञ संचालक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रविंद्र घाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. एकंदरीत, योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचा २९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडला.