औंध छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ येथे ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियान’ संपन्न !

औंध : खासदार मुरलीधर मोहोळ यांनी खासदार जनसंपर्कसेवा अभियान छत्रपती शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघांमध्ये नागरिकांच्या समस्या ऐकून सोडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी हजारो नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या एकूण 17 विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर छत्रपती शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे हे देखील उपस्थित होते.

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात औंध भागातील इंदिरा गांधी शाळा येथे पार पडलेल्या या अभियानात समाजाच्या सर्व घटकातील नागरिकांची उपस्थिती आणि सहभाग घेत आपल्या समस्या मांडल्या.वैयक्तिक कामे, सार्वजनिक समस्या, नागरी प्रश्न, विकासकामांबाबत नव्या कल्पना असे विविध प्रकारचे मुद्दे नागरिकांनी यावेळी खासदार मोहोळ यांच्याकडे मांडले. जे प्रश्न लगेचच सुटतील, अशा प्रश्नांच्या बाबतीत त्वरित निर्णय घेण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या. तर इतर प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे अधिकाऱ्यांना खासदारांनी सांगितले. यावेळी पुणे महापालिका प्रशासन, पोलीस, वाहतूक पोलीस, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध विभागांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

पुणे महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचे स्टॉल्स या अभियानांतर्गत लावण्यात आले होते, ज्याचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यावेळी छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचेआमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह भाजपा पुणे शहर आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील खेळणी दुरुस्त शिवसेनेने दिले अनोख्या स्टाईलने पत्र