साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त आम आदमी पार्टीकडून येरवड्यात अभिवादन

येरवडा : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने येरवडा येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे रंगमंदिर येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेच्या वतीने पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अमित म्हस्के यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबाबत बोलताना सांगितले की, “शोषित, वंचित आणि गरीब जनतेसाठी अण्णाभाऊंनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे साहित्य आणि कार्य हे आजही समाज बांधवांसाठी प्रेरणादायी आहे.”

या कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेच्या वतीने पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अमित म्हस्के यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबाबत बोलताना सांगितले की, “शोषित, वंचित आणि गरीब जनतेसाठी अण्णाभाऊंनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे साहित्य आणि कार्य हे आजही समाज बांधवांसाठी प्रेरणादायी आहे.”

कार्यक्रमास आम आदमी पार्टी पुणे शहर संघटनमंत्री श्री. मनोज शेट्टी, शहर उपाध्यक्षा श्रद्धाताई शेट्टी, हरून मुलानी, शमीम मुलानी, अनिल धुमाळ, शिक्षक आघाडी अध्यक्ष शितलताई कांडेलकर, जोगिंदर पाल सिंग व इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  कृषी विभाग राज्यस्तरीय खरीप हंगाम पीक स्पर्धेचा निकाल जाहीर