पाषाण : पाषाण येथील सुस-रोड येथील साई चौकात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण नि.ब्रिगेडियर श्री एस.आर.लुकतुके यांच्यासह सैन्य दलातील अधिकाऱ्यांसह करण्यात आले.निव्रृत्त कर्नल एम.बी.सायनाकर, कमांडर आर.के.सुर,ले.कर्नल विजय खारकर,असि.आर्मी मे.को.व्हि.बी.डिकसंगीकर,ज्यु.ऑ.वायुसेना आर.एम.भारतीय या सैन्य दलातील नि.अधिकाऱ्यांना अरुण रोडे,रत्नाकर मानकर, आनंद करमरकर, किशोर मोरे,विजय कुकडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
ऑपरेशन सिंदूर अजुन संपलेले नाही,भारतीय वायुसेनेने आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले आहे,पाकिस्तानचे अकरा हवाई तळ वायुसेनेने उद्ध्वस्त केले आहेत. पाकिस्तानने भारताला युद्ध विरामची विनंती केली म्हणुन ऑपरेशन सिंदूर तुर्त स्थगित आहे,ब्रम्होस् क्षेपणास्त्राच्या अचूक वेधाने पाकिस्तानचे अण्वस्त्र तळ उध्वस्त केले आहेत अशी माहीती ब्रिगेडियर लुकतुके यांनी आपल्या भाषणात दिली.
पुणे शहर भाजप मा.उपाध्यक्ष उपाध्यक्ष राहुलदादा कोकाटे व मयुरीताई कोकाटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले,तर गिरीश चोक यांनी सूत्रसंचालन केले.उत्तम जाधव यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.