औंध मस्जिद तर्फे प्रथमच 79 वा स्वातंत्र्य दिवस साजरा

औंध : औंध मस्जिद तर्फे प्रथमच 79 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. मस्जिदी समोर औंध ग्रामस्थ व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय तिरंगा ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा केला.

मज्जीद ट्रस्टतर्फे औंध विश्वस्त मंडळ, औंध ग्रामस्थ व औंध शिक्षण मंडळ यांना आमंत्रित करण्यात आले होते.ट्रस्टचे पदाधिकारी अलाउद्दीन पठाण, फयाज खान शकील सय्यद, हमीद सय्यद, यंग सर्कल व औंध ग्रामस्थ सर्व उपस्थित होते.

यावेळी सर्व भारतीय नागरिकांना बंधू भावाची, समता व एकात्मतेचा संदेश यावेळी देण्यात आला.

See also  औंध येथे सीनियर सिटीजन असोसिएशन ऑफ औंधच्या वतीने 'गाऊ कथा तुकोबांची' कार्यक्रम संपन्न